अशीच आवडलेली काही वाक्ये...


''वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं, आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळवाच लागतं. ''
- - - - - - - - - - - - - - - - - - -
ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे. त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे चांगलाच कळलाय ...
- - - - - - - - - - - - - - - - - - -
"चांगली वस्तु", "चांगली व्यक्ती", "चांगले दिवस", यांची किंमत "वेळ निघून गेल्यावर समजते..."
- - - - - - - - - - - - - - - - - - -
"आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं...!
अमृत मिळत नाही. म्हणून विष कधी प्यायचं नसतं...!"
- - - - - - - - - - - - - - - - - - -
तुमचे डोळे चांगले असतील तर, तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल...
पण जर,
तुमची जीभ गोड असेल तर, हे जग तुमच्या प्रेमात पडेल...
- - - - - - - - - - - - - - - - - - -
"चांगली वस्तु", "चांगली माणसे", "चांगले दिवस, आले कि माणसाने "जुने दिवस विसरू नये".
""""""""""""""""""""""""""""""""""
पाणी धावतं. म्हणून त्याला मार्ग सापडतो. त्याप्रमाणे, जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडते...
_________________________
नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे, कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात, तर आयुष्यभर एकटे राहाल...
_________________________
जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण, कारण हि विसरता येत नाही अन त्या व्यक्तीला परत हि देता येत नाही.
________________________
आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते...
आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते...
पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे आपला "स्वभावाच" ठरवतो...
_________________________
हे देवा, माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दीर्घायुष्य लाभू दे आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे...
_________________________
तिच्या डोळ्यांत पहिले तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात...आणि
ती सोडून गेली तेव्हा समजले खरं प्रेम कशाला म्हणतात...
_________________________
प्रेम म्हणजे... समजली तर भावना आहे, केली तर मस्करी आहे, मांडला तर खेळ आहे, ठेवला तर विश्वास आहे, घेतला तर श्वास आहे, रचला तर संसार आहे, निभावलं तर जीवन आहे...
_________________________
जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले. कारण..., "समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा, आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम..."
__________
आयुष्य जगण्यासाठी नुसते
विचार असुन चालत नाही;
सुविचार असावे लागतात.
आपण कसे दिसतो यापेक्षा
कसे असतो याला अधिक
महत्त्व आहे.
.
गरूडाइतके उडता येत नाही
म्हणून चिमणी कधी उडण्याचे
सोडत नाही.
अहंकार विरहीत लहान
सेवाही मोठीच असते.
तुम्हाला जर मित्र हवे असतील
तर आधी तुम्ही दुसऱ्याचे
मित्र बना .
चांगले काम करायचे मनात
आले की ते लगेच करून टाका.
केवड्याला फळ येत नाही पण
त्याच्या सुगंधाने तो अवघ्या
जगाला मोहवून टाकतो
तुम्ही कायम सदैव खुश राहा
आणि आनंदात जगा....!
1. जीवनाचा अर्थ विचारायचा
असेल तर तो आकाशाला विचारा.
2. बचत म्हणजे काय आणि
ती कशी करावी हे
मधमाश्यांकडून शिकावं.
3. गुलाबाला काटे असतात
असे म्हणून रडत बसण्यापेक्षा
काट्यांना गुलाब असतो
असे म्हणत हसणे उतम !
4. वेदनेतूनच महाकाव्य
निर्माण होते.
5. भुतकाळ आपल्याला
आठवणींचा आनंद देतो;
भविष्यकाळ आपल्याला
स्वप्नांचा आनंद देतो पण
आयुष्याचा आनंद फ़क्त
वर्तमानकाळच देतो.
6. मृत्यूला सांगाव, ये !
कुठल्याही रुपाने ये..
पण जगण्यासारखं काहीतरी
जोपर्यंत माझ्याकडे आहे
तोपर्यंत तुला या दाराबाहेर
थांबावं लागेल.
7. मोती बनून शिंपल्यात
राहण्यापेक्षा दवबिंदू
होऊन चातकाची तहान
भागविणे जास्त श्रेष्ठ.
8. ज्याच्या जवळ सुंदर
विचार असतात. ,
तो कधीही एकटा नसतो.
9. जखम करणारा विसरतो
पण जखम ज्याला झाली
तो विसरत नाही.
10. आपण पक्षाप्रमाणे
आकाशात उडायला शिकलो,
माशाप्रमाणे समुद्रात पोहायला
शिकलो पण जमिनीवर
माणसासारखे वागायला
शिकलो का ??
याचा कोठे तरी विचार करा ...

नव्या साबणाच्या वडीला जुन्या साबणाचा तुकडा चिकटवतात त्यावर काही वाचलेलं आठवतंय...
जुनी पिढी आणि नविन पिढी याच्याशी संबंध सांगणारं....
जुना तुकडा चिकटण्यासाठी नविन साबणाचा तो पृष्ठभाग थोडासा तरी झीजावा लागतो
आणि
जुन्या साबणाला स्वत:चा आकार सोडून नविन साबणाचा आकार घ्यावा लागतो.
पण असं केल्यामुळे, नविन साबण जास्त टिकतो
आणि
जुना साबण पुर्णपणे वापरला जातो...
अन्यथा तो शेवटपर्यंत वापरता येत नाही.
सेम तसंच दोन पिढ्या एकत्र येण्यासाठी दोन्हीकडून थोडी झीज किंवा स्वत:चा आकार सोडून दुसर्याचा आकार स्वीकारणे हे घडलं तर दोघांच्याही फायद्याचं आहे....

Ref: Facebook update...

Comments

Popular posts from this blog

माधुर्य रस भाव

How to wear tulasi (Kanti) mala

वास्तुशास्त्रानुसार आदर्श वास्तू