वास्तुशास्त्रानुसार आदर्श वास्तू


सगळ्यांनाच वास्तूशास्त्रा प्रमाणे घर घेता येणे अथवा बांधणे शक्य नाही. पण ते साधारणत: या चित्रात दिल्याप्रमाणे असावे....आणि असेही म्हंटले जाते की जगातील कोणतेही घर अगदी १००% वास्तुशास्त्राप्रमाणे असू शकत नाही. 

यातील ज्या उपदिशा आहेत त्या कमी महत्वाच्या नसून खूप खूप महत्वपूर्ण आहेत. आणि त्यांच्यावर पंचमहाभूतातील तत्वांचा प्रभाव असतो....आग्नेय या दिशेवर नावाप्रमाणेच अग्नी तत्व, ईशान्येवर जलतत्व, वायव्येवर वायू तत्व आणि नैऋत्य दिशेवर भूमी तत्वाचा प्रभाव असतो....तुलनेने नैऋत्य ही जास्त संहारक परिणाम देणारी दिशा आहे.....अर्थात तिथे खोदकाम केले, बोअर, विहीर मारली तर .....

स्वयंपाकाचा अग्नीशी संबंध असल्याने अर्थातच स्वयंपाकघर आग्नेय दिशेला असणे उत्तमच, नसल्यास किमान किचन ओटा तरी आग्नेयेला असावा. Gas शेगडी आग्नेयेला तर सिंक इशान्य दिशेला हवे....घराचा मधला भाग शक्यतो मोकळा ठेवावा. देवघर ईशान्य किंवा आग्नेय दिशेला असावे.

देवघरात घरातील जिवंत किंवा मृत व्यक्तींचे फोटो लावू नयेत. त्या आपल्याला प्रिय असल्या तरी त्यांच्या फोटो मधून वाईट स्पंदने येत असू शकतात आणि ती प्रगतीला, उपासना स्थळाला नक्कीच मारक असतात. देवघरात स्वामी समर्थ, साईबाबा, गजानन महाराज, शंकर महाराज, कलावती आई, सिद्धारूढ स्वामी या आणि अशाच इतर अनेक संत आणि सिद्धांचे मूळ, अस्सल फोटो अवश्य लावावेतच....त्यांच्या फोटोमधून येणारया लहरी अतिशय उपकारक असतात. घरात कोठेही काच, आरसे वापरात असाल तर जपून वापरा. कारण काच ही कोणतीही दिशा आणि वस्तू, वास्तू, चित्रे ....काचेत प्रतिबिंबित होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला गुणित करून दाखवते, वाढवून दाखवते आणि घर, वास्तू, दुकान मोठे असल्याचा भासही होतो....चुकीच्या ठिकाणी अयोग्य वापर झाल्यास वाईट गोष्टी, वस्तू प्रतीगुणीत होतील.

घरात सकाळ संध्याकाळ तेलाचा किंवा तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावणे खूप हितावह आहे. त्याचे अध्यात्मिक लाभ असतील ते असतील पण आपले मन मात्र प्रसन्न होते. आनंदाने भरून जाते. आणि देव नेहमीच प्रसन्न असतो. धूप, उदबत्ती लावून प्रसन्न करायचे असते ते आपल्या मनाला.....आपल्या घराला.... घरात मंगल ध्वनी, जपाची टेप असणे आनंददायी का होणार नाही? घरात, देवघरात, पायरीवर, उंबऱ्यावर आपल्याला जी येत असेल ती रांगोळी घालाच. ती घरामध्ये येणारया वाईट स्पन्दनांना अटकाव तर करेलच पण रांगोळी हे एक शुभ यंत्रच असल्याने रांगोळी घालणारा आणि ती पाहणारा या दोघांच्याही मेंदूत पर्यायाने मनात सकारात्मक बदल घडवून आणून भविष्य सुधारण्यास थोडी का होईना नक्की मदत करेल यात शंकाच नाही.

स्वयंपाक करत असताना किंवा जेवण्यापूर्वी अग्नीत, चुलीत, Gas शेगडीवर किंचित तूप लावलेला भात, पोळीचा, चपातीचा, भाकरीचा कशाचा तरी तुकडा असे काहीतरी थोडेसे समर्पित करा...अग्नी हा देवांचा दूत किंवा वाहक आहे. स्वयंपाक बनवीत असताना भगिनी मातांनी दुसऱ्याची उणी दुणी काढणे, संतापाने भांड्यांची आदळआपट करणे, नाराजीने स्वयंपाक बनवणे हे घरातील कोणालाही अजिबात हितकर नाही. आद्य शंकराचार्यांचे अन्नपूर्णा स्तोत्र म्हणत स्वयंपाक केला तर फारच उत्तम. येत नसल्यास देवाचे नामस्मरण करत स्वयंपाक बनवावा.

आनंदी रहा....अनेक शुभेच्छा ....


ref: Facebook post

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

माधुर्य रस भाव

How to wear tulasi (Kanti) mala