Posts

Showing posts from May, 2014

वादविवाद कसे टाळावेत ?

Image
  वाद, विवाद, भांडणे हा समाज जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. शांत, विवादरहित समाजाची संकल्पना हे केवळ एक स्वप्न आहे. वास्तवात, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. प्रत्येकाचे विचार, दृष्टीकोन वेगवेगळे असतात. खरतर, समाजाचा पायाच हा आहे. आणि या विविधतेच्या आधारेच मानवाने इतकी प्रगती साधली आहे. असो. जर आपण हि विविधता समाजाचा एक अविभाज्य घटक आहे असे मानले तर वाद विवाद हे अटळ आहेत.आणि जर ते अटळ आहेत तर त्याला प्रश्न न समजता ते योग्य रीतीने कसे हाताळावे हे शिकणे जास्त महत्त्वाचे ठरते. वाद किंवा भांडण ज्याला आपण मतभिन्नता म्हणू, स्वतः एक समस्या नाही. परंतु, मतभिन्नता जेंव्हा अयोग्य प्रकारे हाताळली जाते, तेंव्हा त्याचे रुपांतर वादात होते आणि त्याचे पर्यावसन मोठ्या भांडणात होते. खरतर, वादविवाद जेंव्हा योग्य प्रकारे सोडवले जातात तेंव्हा, त्या दोन माणसांमधील किंवा गटांमधील दुरी निघून जावून ते अधिक जवळ येतात. त्यांचे संबंध अधिक घट्ट होतात.  तुम्ही मतभिन्नतेला, वादाला कशाप्रकारे हाताळता यावरच तुमच्या जीवनातले यश अपयश अवलंबून आहे. या बाबतीत खाली दिलेल्या काही सूचनांचा वापर आपण करू शकतो. १)