वादविवाद कसे टाळावेत ?


 वाद, विवाद, भांडणे हा समाज जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. शांत, विवादरहित समाजाची संकल्पना हे केवळ एक स्वप्न आहे. वास्तवात, व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. प्रत्येकाचे विचार, दृष्टीकोन वेगवेगळे असतात. खरतर, समाजाचा पायाच हा आहे. आणि या विविधतेच्या आधारेच मानवाने इतकी प्रगती साधली आहे. असो. जर आपण हि विविधता समाजाचा एक अविभाज्य घटक आहे असे मानले तर वाद विवाद हे अटळ आहेत.आणि जर ते अटळ आहेत तर त्याला प्रश्न न समजता ते योग्य रीतीने कसे हाताळावे हे शिकणे जास्त महत्त्वाचे ठरते.

वाद किंवा भांडण ज्याला आपण मतभिन्नता म्हणू, स्वतः एक समस्या नाही. परंतु, मतभिन्नता जेंव्हा अयोग्य प्रकारे हाताळली जाते, तेंव्हा त्याचे रुपांतर वादात होते आणि त्याचे पर्यावसन मोठ्या भांडणात होते. खरतर, वादविवाद जेंव्हा योग्य प्रकारे सोडवले जातात तेंव्हा, त्या दोन माणसांमधील किंवा गटांमधील दुरी निघून जावून ते अधिक जवळ येतात. त्यांचे संबंध अधिक घट्ट होतात. 
तुम्ही मतभिन्नतेला, वादाला कशाप्रकारे हाताळता यावरच तुमच्या जीवनातले यश अपयश अवलंबून आहे. या बाबतीत खाली दिलेल्या काही सूचनांचा वापर आपण करू शकतो.

१) जेंव्हा एखादी व्यक्ती रागाने तुमच्याशी बोलायला सुरवात करेल तेंव्हा लगेच प्रत्युत्तर देण्याएवजी किंवा प्रतिक्रिया देण्याआधी, किंवा गांगरून जाण्याएवजी, एक मिनिट थांबा. एकूण परिस्थितीत तुमचा किती सहभाग आहे ते पहा. आपल्या प्रत्येक कृतीची किंवा बोलण्याची जबाबदारी घ्या. आपण बोललेलो किंवा केलेल्या कृतीला अमान्य करू नका.  किंवा त्यासाठी इतरांना दोषी ठरवू नका.
२) वाद चालू असताना विषयावरच राहा. विषयांतर करू नका. विषयांतराने मूळ मुद्दा बाजूला राहून उगाच वाद चीघलतो.
३) आपलेच म्हणणे रेटत बसण्यापेक्षा इतरांचे म्हणणे नीट ऐकून घ्यावे व सामोपचाराने उपाय शोधण्याकडे कल ठेवावा.
४) समोरच्याचे म्हणणे जेंव्हा कळले नसेल तेंव्हा स्वतःहून नसता अर्थ काढण्याएवजी, त्याला पुन्हा त्याच्या म्हणण्याचा अर्थ विचारावा.
५) विवादाच्या मर्यादा ठरवाव्यात. कुणालाही तुंम्हाला शाब्दिक किंवा शारीरिक इजा करू देऊ नका.
६) जेंव्हा वाद मिटत नसेल तेंव्हा एखाद्या त्रयस्थ व्यक्तीची मदत घ्या.
७) लक्षात ठेवा, वादापासून दूर राहिल्याने किंवा ते टाळल्याने वाद सुटत नसतात.  त्याने उलट असंतोष जन्माला येतो. जो आणखीनच त्रासदायक असतो.
८) सगळ्यात महत्त्वाचे, कधीच वादामध्ये जिंकल्याने वाद सुटत नाहीत. त्याने तुंम्हाला शांती मिळेलच असे नाही. वाद फक्त सोडवता येतात जिंकता येत नाहीत.
९) इतरांना काहीही वाटो, तुमच्या मनाप्रमाणे सारे काही झाले तर वाद मिटला असे जर तुंम्हाला वाटत असेल तर तो गैरसमज आहे. अशावेळी वाद फक्त थोडावेळ थांबतो व पुन्हा उद्भवतो. म्हणूनच वाद जिंकण्याएवजी तो सोडवण्याचा प्रयत्न करा.

काही अपरिहार्य कारणामुळे सुरेशने आपल्या ऑफिसची वेळ बदलून साडेनऊएवजी नऊची केली व त्याप्रमाणे आपल्या सर्व कर्मचार्यांना कळवले.संचिताला सकाळी आपल्या मुलाला शाळेत सोडायला जावे लागत असे. त्यामुळे नवीन वेळ लागू झाल्यानंतर तिला वरचेवर ऑफिसला उशीर होऊ लागला. सुरेशला वाटायला लागले कि हि जाणून बुजून उशिरा येते आहे.  आणि हिला नवीन वेळ मान्य नाही. या परिस्थितीत सुरेश दोन प्रकारे प्रतिक्रिया देऊ शकतो.

१) सुरेश, संचिताच्या उशिरा येण्याबद्दल तिच्याकडे संताप व्यक्त करतो. व तिला वेळेवर येण्यास सांगतो. संचिता नेहेमीच वेळेवर येण्यासाठी प्रयत्न करत असते. पण सुरेशची अशी वागणूक तिला अन्यायकारक वाटते व ती सुरेशला प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न करते. पण सुरेश तिला आपण बॉस असल्याचे सांगून तिने आपले म्हणणे एकलेच पाहिजे असे सांगतो. अशाप्रकारच्या भांडणामुळे सुरेश संचिताला आळशी आणि बेजबाबदार समजू लागतो. व संचिता सुरेशला एक वाईट व आपल्याबद्दल पक्षपाती समजू लागते.तिला दोनतीन मिनिटे उशीर झाला तरी सुरेश तिला ओरडू लागतो. तीही रागाने कामात टंगलमंगळ करू लागते. मुद्दाम जास्तवेळ लंचब्रेक घेऊ लागते. बरयाचदा इतर कर्मचार्यांना त्यांच्या या भांडणात ओढले जाऊ लागते. आणि अशारितीने पूर्वी संचिता आळशी व बेजबाबदार असल्याचा समाज आता खरा ठरतो.

परिणाम : मूळ मुद्दा बाजूला राहून, दोघांच्या मनात एकमेकांविषयी द्वेष व संताप तयार होतो.
जर दोघेही आपल्याच म्हणण्यावर अडून राहील व वाद जिंकण्याचा प्रयत्न केला तर वादात कुणीही जिंकले तरीही त्याचे परिणाम वाईटच होणार. परंतु हा वाद जिंकण्याएवजी सोडवला तर मात्र त्यातून चांगले परिणाम मिळतील.
वाद, भांडणे हि फक्त कामाच्या जागीच होतात असे नाही. ती घरी, मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये कुठेही असू शकतात. त्यांच्यामुळे एकमेकांत कटुता निर्माण होऊ शकते. परंतु ती जर व्यवस्थितपणे हाताळली तर नातेबंध अधिकच दृढ होतात.

आपण एक उधाहरण घेऊ. संचिता आणि तिचा बॉस, सुरेश. 
२) आपण बॉस असल्याची जाणीव बाजूला ठेवून सुरेश संचिताला तिच्या उशिरा येण्याच्या करणाची विचारपूस करतो.  त्याला खरे कारण कळते. आता तो या प्रश्नावर वाद घालण्यापेक्षा यावर उपाय शोधतो. तिच्या कामाचं ऐकून स्वरूप समजून घेऊन तो तिच्या सुरवातीच्या अर्ध्यातासाचे काम दुसरया स्टाफला देतो. व त्या बदल्यात संचिताला संध्याकाळी अर्धा तास उशिरा थांबून त्या दुसरयाचे काम करायला सांगतो. एकूणच या वादात कुणीही न जिंकता वाद सोडवला जातो.
परिणाम : संचिताच्या मनात आपल्या बॉस बद्दल कृत्ध्न्यता व आदर निर्माण होतो. सुरेशचे कामही कुठे थांबत नाही.

Ref:  जेंव्हा वादविवाद निर्माण होतात तेंव्हा…. Posted on  by नितिन तांडेल

Comments

Popular posts from this blog

माधुर्य रस भाव

How to wear tulasi (Kanti) mala

वास्तुशास्त्रानुसार आदर्श वास्तू