ब्राह्मणांनीच ५००० हजार वर्ष आमच्यावर अन्याय केला
" ब्राह्मणांनीच ५००० हजार वर्ष आमच्यावर अन्याय केला ! " मला कळत नाही तीन, साडे तीन टक्केवाले ब्राह्मण सुपरमॅन होते की काय ? मनुस्मृतीप्रमाणे सुरूवातीला जे 4 वर् ण होते... ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र... त्यातल्या शूद्रांवर जर फक्त ब्राह्मणांनीच अन्याय केला... साडे तीनटक्के वाले लोक... तेव्हा बाकीचे दोन वर्ण काय शूद्रांना सहानुभूती देत होते का ? तेव्हा हे बाकीचे 2 वर्ण ब्राह्मण वर्णने केलेल्या सो कॉल्ड अन्यायाचा तोंडाला काळे फडके बांधून निषेध करत होते का ? कि चळवळ उभारत होते ? नंतरच्या काळात पोटजाती निर्माण झाल्यावर त्यांना पण शूद्र म्हणून हिणवले जाऊ लागले त्यांच्याबरोबर रोटीबेटीचे व्यवहार कोणी बंद केले? स्वतःच्या वर्णाच्या क्षत्रिय,वॆश्य लोकांनीच ना? कारण ते सत्तेत अथवा तिच्या जवळ आल्याने स्वतः ला उच्च वर्णीय म्हणून घेऊ लागले होते. दलित-बहुजन-ओबीसी समाजाच्या लोकांच्या मनात आज जाहीर भाषणांतून, लेखांतून हेच ठासवलं जातंय कि तुमच्यावर सगळा काय तो अन्याय ब्राह्मणांनीच केला. एकदा नुसता लॉजिकल विचार करून पहा. असं कसं शक्य आहे ? पूर्वी भारतात बहुसंख्यंने ग्राम व...