Jivanache Ankaganit
डोक्यावरचं कर्जाचं ओझं जड झालं की आपलं आणि आपल्या कुटुंबियांचं आयुष्य संपवणं , हा अलीकडे सोपा इलाज होऊ लागला आहे. पण आयुष्य मौल्यवान असतं , आपलं आणि आपल्याशी जोडलेल्या कुटुंबाचंही. ते ' अर्थपूर्ण ' करणं अधिक सोपं आहे , संपवण्यापेक्षा. .......... गेल्या आठवड्यात एका बातमीने सगळं मुंबई शहर हादरून गेलं. एका मध्यमवर्गीय कुटुंबातल्या कर्जबाजारी बापानं मुलांचा खून केला आणि नंतर पत्नीसह आत्महत्या केली. दोन दिवसांनी घरातून कुजलेले मृतदेह बाहेर काढावे लागले! खरंतर अशा बातम्या महिन्या दोन महिन्यांनी कुठल्या ना कुठल्या शहरातून येत असतात. तपशील बदलतात ... कहाणी एकच असते. कर्जात आकंठ बुडालेलं कुटुंब. त्यातून मार्ग न निघाल्याने बायको-मुलांची हत्या करून स्वतःला संपवणारा घरातला मध्यमवयाचा कर्ता पुरुष ... चटका लावणारे हे प्रसंग या देशातलं बदलतं आर्थिक आणि सामाजिक वास्तव दाखवतात. त्याच्या मुळाचा शोध घेताना थेट आपलं आर्थिक धोरण खुलं झालं तिथप...