Posts

Showing posts from June, 2018

अनुग्रहाची AMC

अनुग्रहाची AMC (सुंदर) आमच्या सोसायटीत दर वर्षी दोन वेळा पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याचा कार्यक्रम असतो. साधारण ज्या दिवशी टाकी स्वच्छ होणार असते त्या दिवसापूर्वी दोन दिवस आमचा वॉचमन सोसायटीमधल्या सगळ्या घरात येऊन "कल टाकी साफ होनेवाला है. पुरा दिन पानी बंद रहेगा. घरमे पानी भरके रखना. परसो भी सफाईके कारण थोडा गंदा पानी आ सकता है. थोडा ध्यान रखना" अशी सूचना देऊन जातो. आणि ठरलेल्या दिवशी ती टाकी सफाईची प्रक्रिया सुरु होते. एकदा मला ती टाकी साफ होत असताना बघण्याचा योग आला होता. सगळीच प्रक्रिया एकदम डोळे उघडणारी होती. अगोदर टाकीमधील सर्व पाणी काढून ती रिकामी केली गेली आणि नंतर टाकीचं झाकण उघडलं. त्यात तळाशी इतका गाळ होता की माझा विश्वासच बसला नाही. आमच्या टाकीचं झाकण नेहेमी कुलूप लावून बंद असतं त्यामुळे त्यात वरून कचरा, माती पडणं शक्यच नाही. म्हणजे  दररोजच्या पाणी पुरवठ्यामधून जे पाणी गाळून स्वच्छ होऊन येतं त्यातसुद्धा इतकी माती आणि सूक्ष्म कचरा असतो. जे पाणी टाकीत पडत असतं ते शुद्ध आणि स्वच्छच आहे असं दिसतं खरं पण थोडी अशुद्धी त्यात नकळत येतच असते. हीच अशुद्धी तळाशी गाळ ह...